img

कार्यप्रकार

कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम 1998 कलम 18 नुसार  महामंडळाची कामे पुढीलप्रमाणे आहेत

(अ) पुढील बाबींना चालना देणे आणि त्या कार्यान्वित करणे,--
(एक) अनुसूचींमध्ये नमूद केलेले पाटबंधारे प्रकल्प आणि लाभक्षेत विकास-पूर नियंत्रणासह; आणि
(दोन) जलविद्युत, ऊर्जा निर्मितीच्या योजना

(ब) पाटबंधारे प्रकल्पांच्या व त्यांच्या लाभक्षेत्र विकासाच्या योजनाची आखणी, अन्वेषण, संकल्पचित्रण, बांधकाम आणि व्यवस्था;
(क) जलविद्युत उर्जा निर्मितीच्या योजना आखणे, त्यांचे अन्वेषण, संकल्पचित्रण, बांधकाम आणि व्यवस्था ;
(ड) या अधिनियमान्वये मत्ता व दायित्वे यांसह महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आलेली कामे आणि कोणत्याही अन्य बाबी यांच्या संबंधात करार करणे :
(ई) निविदा, बोली, देकार मागवणे आणि महामंडळाच्या सर्व कामांच्या प्रयोजनांसाठी करार करणे.
(ण) पूर नियंत्रण व लाभक्षेत्र विकास आणि जलविद्युत प्रकल्प यांसह पाटबंधारे प्रकल्पाच्या योजनांची आखणी, अन्वेषण, संकल्पचित्रण, बांधकाम आणि व्यवस्थापन यामध्ये कोणत्याही व्यक्तींच्या किंवा व्यक्ती गटाच्या किंवा संघटनेच्या तो विधी संस्थापित असा किवा नसो, सह‌भागास उत्तेजन देणे;
(ग) महामंडळ ज्यासाठी स्थापन झाले असेल ती प्रयोजने साध्य करण्याभाठी आणि त्यांच्याशी संबंधित सर्व बाबींसाठी संयुक्तपणे अन्य निगम निकाय किंवा संस्था यांच्याबरोबर किंवा शासन किंवा स्थानिक प्राधिकरण यांच्याबरोबर किंवा एजन्सी तत्वावर योजना किंवा कामे हाती घेणे :
(ह) मत्स्यव्यवसाय, मत्स्यसंवर्धन, पुष्पसंवर्धन, रेशीम उत्पादन, ऊतिसंवर्धन, इत्यादींसाठी पाटबंधाऱ्यांशी संबंधित कामांना चालना देणे;
(आय) पाटबंधारे आणि जल विद्युत प्रकल्पांच्या ठिकाणी व परिसरात पर्यटन, जलक्रीडा किंवा अन्य संबंधित उपक्रम यांना चालना देणे;
(जे) तलावासभोवतीच्या व तलावाजवळील आणि इतर योग्य ठिकाणांमधील जमीन पाटबंधारे विषयक सुविधा व इतर पायाभूत सुविधांसह विकसित करणे आणि स्वारस्य असलेल्या व्यक्तींना अशा विकसित मालमत्ता अंणतः किंवा पूर्णतः भाडेपट्टद्याने देणे ;
(के) वाषिक योजना आणि पंचवार्षिक कार्यकारी विकास योजना तयार करणे;
(ल) वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे,
(म) महामंडळ ज्यांच्यासाठी स्थापन झाले आहे ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्य शासनाने सोपविलेली कोणतीही इतर कामे हाती घेणे किंवा त्यातील काही कामे वगळणे.