img

पर्यटन

जलसंपदा विभागाच्या दि. 22/08/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्रामधील जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या जलाशयामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने शिफारशी व समन्वय साधण्याकरिता जलसंपदा व पर्यटन विभाग यांची एकत्रित समिती गठीत करण्यात आली असून उपरोक्त धोरणानुसार भातसा धरण प्रकल्प, ता. शहापूर, जि. ठाणे,  वैतरणा जलविद्युत प्रकल्प, ता. इगतपुरी जि. नाशिक,  अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्प ता. राजापूर, जि. रत्नागिरी,  मुचकुंदी लघु पाटबंधारे प्रकल्प, ता. लांजा जि. रत्नागिरी, नातूवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, ता. खेड, जि. रत्नागिरी, निवे लघु पाटबंधारे प्रकल्प, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी , माडखोल लघु पाटबंधारे प्रकल्प, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग , कोर्ले सातंडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, ता. देवगड जि. सिंधुदुर्ग , तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग येथे पर्यटन क्षम जागा उपलब्ध असल्याने पर्यटन स्थळे विकसित करण्याचे प्रस्तावित आहे.