img

कार्यप्रकार

कार्यप्रकार 

1.1) महामंडळाची स्थापना

गोदावरी खोऱ्यातील महाराष्ट्राच्या वाटयाला आलेले पाणी द्रुतगतीने उपयोगात आणून खोऱ्यातील पाटबंधारे प्रकल्प, लाभक्षेत्र विकास प्रकल्प, जल विद्युत व उर्जा निर्मिती योजना इत्यादींना चालना देण्यासाठी महाराष्ट्र अधिनियम क्र.23, दिनांक 17-08-1998 अन्वये महामंडळाची स्थापना झाली व दिनांक 1-10-1998 पासून प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली.

1.2) गोदावरी खोऱ्याची भौगोलिक माहिती

गोदावरी नदी सह्याद्रीच्या घाटातून नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. पुढे ती अहमदनगर, छ.संभाजीनगर  नांदेड जिल्हयातून वाहत आंध्र प्रदेशात जाते व राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास मिळते. या महामंडळाच्या हद्दीमधे उगमापासून ते राज्य सीमेपर्यंत मुख्य गोदावरी नदीची लांबी 732 कि.मी. आहे. जिल्हा निहाय भौगोलिक क्षेत्र खालील प्रमाणे आहे.

(क्षेत्र : लक्ष हेक्टर)

अ.क्र.

जिल्हा

एकूणभौगोलिकक्षेत्र

गोदावरीखोऱ्यातीलक्षेत्र

अन्यखोऱ्यातीलक्षेत्र

अवर्षणप्रवणतालुके

(गोदावरीखोऱ्यातील)/ आदिवासी तालुके/एकूणतालुके/

1

2

3

4

5

6

1

औरंगाबाद

10.108

9.640 (95%)

0.468 (तापी)

(5 % )

वैजापूर,गंगापूर,कन्नड,पैठण, खुलताबाद, छ.संभाजीनगर (6)/9

2

जालना

7.718

7.718 (100 %)

--

घनसांगवी, अंबड (अंशत:) (2)/8

3

परभणी

6.515

6.515 (100%)

--

(0)/9

4

हिंगोली

4.526

4.526 (100%)

--

(0)/5

5

नांदेड

10.528

10.528 (100 )

--

(0)/किनवट/16

6

बीड

10.694

9.081 (85 %)

1.613 (कृष्णा)

(15 %)

बीड,पाटोदा,गेवराई,माजलगांव, धारुर, केज(अंशत:) (6)/11

7

लातूर

7.157

7.157 (100 %)

--

अहमदपूर, चाकूर (2)/10

8

उस्मानाबाद

7.569

3.075 (41 %)

4.494 (कृष्णा)

(59 %)

भूम (अंशत:), कळंब (अंशत:), उस्मानाबाद (अंशत:), (3)/8

9

अहमदनगर

17.048

10.878 (64%)

6.170 (कृष्णा)

(36 %)

पाथर्डी, अहमदनगर, पारनेर, शेवगांव, राहूरी, संगमनेर (अंशत:), कोपरगांव (अंशत:), श्रीरामपूर (अंशत:), नेवासा (अंशत:), अकोले (अंशत:) (10)/ अकोले/14

10

नाशिक

15.531

12.862 (82 %)

0.550 (तापी) (4 %) 1898 (दमणगंगापार)

(12%) 0.221 (उत्तरकोकण 2 %)

चांदवड, दिंडोरी (अंशत:), सिन्नर (अंशत:), येवला (अंशत:) निफाड(अंशत:), इगतपूरी(अंशत:), नाशिक (अंशत:), (7)/त्र्यंबक, सुरगणा, दिंडोरी,इगतपूरी/15

एकूण

97.394

81.980 (84 %)

15.414

(16 %)

(36) / 105

1)

महाराष्ट्राचे भौगोलीक क्षेत्र

307.713 लक्ष हेक्टर

2)

गोदावरी खोऱ्याचे महाराष्ट्रातील भौगोलीक क्षेत्र (विदर्भ व मराठवाडा)

152.598 लक्ष हेक्टर

3)

गोदावरी खोऱ्याचे महामंडळांतर्गत भौगोलीक क्षेत्र

81.979 लक्ष हेक्टर

4)

महामंडळांतर्गत क्षेत्राची गोदावरी खोऱ्याची महाराष्ट्रातील क्षेत्राशी टक्केवारी

53.64 टक्के

5)

गोदावरी खोऱ्याचे महामंडळांतर्गत भौगोलिक क्षेत्राशी महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्राशी टक्केवारी (3/1 X 100)

26.64 टक्के

1.3) खोऱ्याचे पाणलोट क्षेत्र व अनुज्ञेय पाणीवापर :

गोदावरी पाणीतंटा लवादाच्या निवाडयानुसार पाण्याची उपलब्धता व अनुज्ञेय पाणी वापर खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.

खोरे/उपखोरे

पाणलोटक्षेत्र(लक्ष हेक्टर)

उपलब्धपाणी(दलघमी)/ (अघफू)

लवादानिर्णय दि.19/121975 नुसारअनुज्ञेयवापर(दलघमी)/ (अघफू)

1

उर्ध्वगोदावरीपैठणपर्यंत

22.923

5837/206.13

5837/206.13

2

गोदावरीनिम्नस्त्रोतपैठणतेराज्यसीमेपर्यंत(उर्वरीतगोदावरी)

30.603 4391/155.066 3199.82/113.00

3

पूर्णाखोरेसिध्देश्वरपर्यंत

8.11 1148/40.54 1148/40.54

4

मांजरानिजामसागरपर्यंत (तेरणासह)

10.289 1030.00/36.37

849.60/30.00

5

सुवर्णाउपखोरे

0.174 74/2.613 11.32/0.40

एकूण

72.099 12480.00/440.719 11045.74/390.07

1.4) सुधारित एकात्मिक राज्य जल आराखडा

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, 2005 या अधिनियमाच्या कलम 16 मधील तरतुदींच्या अनुषंगाने मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दि. 21 जून 2024 रोजी झालेल्या राज्य जल परिषदेच्या आठव्या बैठकीत 'सुधारित एकात्मिक राज्य जल आराखडा' यास मान्यता प्रदान करण्यात आली.

सदर आराखड्याच्या खंड-2अ  मधील प्रकल्प याद्यानुसार जायकवाडी धरणा पर्यंत उर्ध्व गोदावरी (प्रवरा व मुळासह) खोऱ्यातील पाणीवापर खालील प्रमाणे मंजूर करण्यात आलेला आहे..

अ.क्र.

विवरण

एकूण वार्षिक पाणी वापर

दलघमी (MCM)

1)

उर्ध्व गोदावरी (जायकवाडी धरणा पर्यंत) मोठे, मध्यम व ल.पा. प्रकल्प (राज्य व स्थानिक स्तरीय) (पूर्ण झालेले व बांधकामाधीन

6627.89 MCM

(234.03 TMC)

i)

जायकवाडी धरण घटक कामासह .. 2605.34 MCM.

ii)

उर्वरित .. 4022.55 MCM

6627.89 MCM

गोदावरी पाणी तंटा लवादानुसार महाराष्ट्राला पैठण धरणा पर्यंत (जायकवाडी धरणा पर्यंत) पूर्ण पाणी वापर अनुज्ञेय आहे. गोदावरी जल आराखड्यात दर्शविल्यानुसार (पृ.क्र. 483) जल विज्ञान प्रकल्प, नाशिक यांनी Vetting केल्यानुसार जायकवाडी धरणा पर्यंत पाण्याचा उपलब्ध येवा 5837 MCM (206.13 TMC) एवढा आहे. सुधारित जलआराखड्यानुसार सद्य:स्थितीत जायकवाडी धरणा पर्यंतचा पाणीवापर 6627.89 MCM (234.03 TMC) लवादाच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे (234.03-206.13=27.90 TMC).

त्यामुळे 'एकात्मिक राज्य जल आराखडा मध्ये जायकवाडी धरणाच्या वर पाणी उपलब्ध नसल्याने नवीन प्रकल्पास वाव नाही.

सदर आराखड्याच्या खंड-1 मधील 10.1.9.2 (Note on middle Godavari Basin) नुसार जायकवाडी धरणाच्या खाली तेलंगणा राज्याच्या सिमेपर्यंत (मध्य गोदावरी) गोदावरी खोऱ्यातील पाणीवापर खालील प्रमाणे मंजूर करण्यात आलेला आहे.

अ.क्र.

विवरण

75 % येव्यानुसार उपलब्ध पाणी (दलघमी )

लवादानुसार अनुज्ञेय पाणी (दलघमी )

प्रस्तावित एकूण पाणी वापर (दलघमी )
पूर्ण व बांधकामाधीन प्रकल्प

भविष्यकालीन प्रस्तावित पाणी वापर (दलघमी )

1

2

3

4

5

6

1

मध्य गोदावरी खोरे (जायकवाडी धरणाच्या खाली तेलंगणा राज्य सिमेपर्यंत) i) उर्वरित मध्य गोदावरी, ii) दुधना उपखोरे iii) पुर्णा उपखोरे (सिध्देश्वर धरणाच्या खाली), iv) लेंडी उपखोरे, v) मानार उपखोरे, vi) सुधा उपखोरे

4391

(155.07 TMC)

3199.82

(113 TMC)

3056.26

(107.93 TMC)

341.49

(12.06 TMC)

गोदावरी पाणी तंटा लवादानुसार पैठण धरणाच्या खाली तेलंगणा राज्य सिमेपर्यंत एकूण 3199.82 दलघमी.(113 TMC) पाणी वापर अनुज्ञेय आहे. सुधारित एकात्मीक जलआराखड्यानुसार सद्य:स्थितीत पूर्ण व बांधकामाधीन प्रकल्पांचा एकूण पाणी वापर 3056.26 दलघमी. (107.93 TMC) आहे. सुधारित राज्य जल आराखड्यामध्ये मध्ये गोदावरी खोऱ्यात 12.06 अघफु चे भविष्य कालीन प्रकल्प प्रस्तावित आहेत.

1.5) महामंडळांतर्गत एकूण प्रकल्प (जून 2022 अखेर)

महामंडळांतर्गत एकूण 1290 प्रकल्प (कृष्णा खोरे व तापी खोरेसह) असून त्यापैकी सिंचन व्यवस्थापनासाठी हस्तांतरीत झालेले कृष्णा खोऱ्यातील 192 व इडकॉम कडील बंद पडलेल्या 116 उपसा सिंचन योजना वगळता गोदावरी खोऱ्यातील 964 प्रकल्प आहेत. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.

प्रकल्पाचाप्रकार

प्रकल्पांचीसंख्या

सिंचन क्षमता (हजार हेक्टर) (वि.प्र.पुणे कडील सोडून)

पाणीसाठा (दलघमी) (2017-18)

मराठवाडा
(विप्र पुणेसह)

उत्तर महाराष्ट्र

एकूण

प्रकल्पीय

निर्मित

उर्वरीत

प्रकल्पीय

निर्मित

उर्वरीत

1

2

3

4

5

6

7

8

9

10

मोठे

12

9

21

1208.937

969.131 239.806

11845.00

10377.00

1468.00

मध्यम

78

12

90

250.783

224.992

25.791

1154.86

1111.48

43.38

लघु + उपसा

878

185

1063

490.343

424.740

65.603

2449.42

2217.29

232.13

एकूण

968 206

1290

(1174+116)

1950.063

1618.863

331.20

15449.28

13705.77

1743.51

वरील प्रकल्पांपैकी सन 2024-25 मध्ये बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

बांधकामाधीन प्रकल्प (सन 2024-25वार्षिक आखणीनुसार)

प्रकल्पाचा प्रकार

प्रकल्पांची संख्या

किंमत (रु.कोटी)

सिंचन क्षमता (हेक्टर)

पाणीसाठा (दलघमी)

अद्यावत

खर्च (03/2023 अखेर)

उर्वरीत

प्रकल्पीय

निर्मित
जून 2023

उर्वरीत

प्रकल्पीय
जून 2023

निर्मित

उर्वरीत

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

मोठे

12

39703.130 20282.072 20154.221 730660 453662 272280 4219.397 3047.467 1143.900

मध्यम

7

3358.635 1253.250 3697.200 63470 21336 37634 153.970 137.350 16.620

लघु

21

2439.589 405.693 2767.104

19842

438 17871 148.444 3.800 125.263

एकूण

40

45501.354 21941.015 26618.532 813972 415456 327785 4521.811 3188.617 1285.783

1.6) बांधकामाधीन प्रकल्पांचे दायित्व 

बांधकामाधीन प्रकल्पांची उर्वरीत किंमत रु. 26618.5321 कोटी असून पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे मार्च 2020 अखेर दायित्व रु.26618.5321 कोटी आहे. 

2) प्रवाही वळण योजना

पश्चिम वाहिनी नद्यांद्वारे अरबी समुद्रास वाहून जाणारे पाणी अडवून प्रवाही वळण योजनाद्वारे तसेच उपसा योजनाव्दारे पूर्वे कडील गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. त्याकरीता एकुण 30 प्रवाही वळण योजनाव्दारे 220.414 दलघमी,  दोन उपसाजोड योजना (उपसा (3) व उपसा (4) ) व्दारे 75.09 दलघमी व दमणगंगा एकदरे योजनेव्दारे 96.100 दलघमी तसेच दमणगंगा,वैतरणा,गोदावरी लिंक योजनाद्वारे 160.97 दलघमी असे एकुण 477.484 दलघमी (16.86 टीएमसी) पाणी आणणेचे प्रस्तावीत आहे. त्यापैकी काही योजनांना प्र.मा मिळुन पुर्ण झालेल्या आहेत. तरी काही योजनांचे प्र.मा चे प्रस्ताव शासनास सादर झालेले आहेत. उर्वरीत योजनांचे प्रस्ताव क्षेत्रिय स्तरावर त्या फलदायी (Feasibility) आहेत किंवा कसे हे तपासणे व सर्वेक्षणाची कामे चालु आहेत. त्यापैकी दमणगंगा-एकदरे-गोदावरी व दमणगंगा-वैतरणा-गोदावरी या दोन नदीजोड योजनांना प्र. मा. प्राप्त झालेली आहे.

सन 2024-25 ची आखणी

सन 2024-25 मध्ये महामंडळातर्गत बांधकामाधीन प्रकल्पांकरिता रु. 2977.5047 कोटी निधी तरतुद मंजुर आहे. सदर निधी तरतुद ही शासन अंशदान, एआयबीपी, नाबार्ड व आदिवासी ठोक तरतुद या शिर्षांखाली उपलब्ध आहे. सन 2024-25मध्ये उपलब्ध निधी तरतुदींच्या अनुषंगाने 27897 हेक्टर सिंचन क्षमता व 133.881 दलघमी. पाणीसाठा निर्माण निर्मीतीचे एकूण 7 प्रकल्प पुर्ण करण्याचे नियोजन आहे. 

केंद्र शासनाचा वेग वर्धित सिंचन लाभ कार्यक्रम (ए.आय.बी.पी.)/PMKSY

या महामंडळांतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत 4 प्रकल्प होते. या प्रकल्पांपैकी निम्न दुधना प्रकल्प, जि.परभणी, नांदुर मधमेश्वर प्रकल्प, जि. नाशिक व उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प, जि. बीड या 3 प्रकल्पांची AIBP अंतर्गतची कामे भौतिक दृष्ट्यापुर्ण झालेली आहे. उर्ध्व पेनगंगा प्रकल्प जि. नांदेड या प्रकल्पाची कामे प्रगत असून जून - 2024 अखेर सदर कामे पुर्ण करण्याचे नियोजन आहे

अ. क्र.

प्रकल्पाचे नाव

प्रकल्पिय

सिंचन क्षमता/पाणीसाठा

निर्मित

सिंचन क्षमता (हे) /पाणीसाठा (दलघमी)

शेरा

1

निम्न दुधना प्रकल्प

44482 हे / 344.80 दलघमी

44482 / 344.80 

भौतिक दृष्ट्या पुर्ण

2

उर्ध्व पेनगंगा प्रकल्प

11575 हे/ 1088.56 दलघमी

102769 / 1011.17 

जून 2025 अखेर पुर्ण करण्याचे नियोजन

3

उर्ध्व कुंडलीका म.प्र.

2800 हे / 18.77 दलघमी

2800 / 18.77 

भौतिक दृष्ट्या पुर्ण

4

नांदूर मधमेश्वर प्रकल्प

52632 हे / 410.13 दलघमी

52632 / 410.13 

भौतिक दृष्ट्या पुर्ण

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छ.संभाजीनगरअंतर्गत केंद्र शासनाच्या अे.आय.बी.पी./ प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY) अंतर्गत खालील तीन मोठे व एक मध्यम प्रकल्प प्रगत आहेत.

4.1 - नांदूर मधमेश्वर टप्पा-2 : सदर प्रकल्पाचा अे.आय.बी.पी. अंतर्गत समावेश 2009-10 मधे करण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वर प्रकल्पाची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त किंमत रु.2210.09 कोटी आहे. नांदूर मधमेश्वर टप्पा-1 अंतर्गत मुकणे, भावली व नांदूर मधमेश्वर कालवा या घटक कामांचा समावेश होता. या घटक कामांतर्गत MOU मधील कामे पूर्ण झाली आहेत. नांदूर मधमेश्वर टप्पा-2 अंतर्गत वाकी व भाम या घटक कामांचा समावेश आहे. वाकी व भाम या धरणामध्ये पुर्ण क्षमतेने 151.22 दलघमी. पाणीसाठा निर्माण झाला असून सदर प्रकल्प भओतिक दृष्ट्या पुर्ण झाला आहे. नांदूर मधमेश्वर कालव्यावरील 20500 हेक्टर क्षेत्र सिंचन निर्मिती झालेली आहे.

4.2 - निम्न दुधना प्रकल्प : निम्न दुधना प्रकल्पास यास वर्ष 2005-06 पासुन केंद्रिय अे.आय.बी.पी. अंतर्गत अर्थसहाय्य प्राप्त होत आहे, प्रकल्पाची सुधारीत अंदाजपत्रकानुसार AIBP घटकाची किंमत रु. 1714.05 कोटी एवढी असुन, प्रकल्पांतर्गत नोव्हें. 2024 अखेर 52785 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.उर्वरित 594 हे. सिंचन क्षमता जुन 2025 पर्यंत पुर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

4.3 - उर्ध्व पेनगंगा प्रकल्प : उर्ध्व पेनगंगा हा मोठा प्रकल्प नांदेड जिल्ह्यात असुन प्रकल्पांतर्गत, ईसापुर येथे पेनगंगा नदीवर धरण ,सापळी येथे कयाधु नदीवर धरण, इसापुर उजवा कालवा, डावा कालवा, कयाधु शाखा कालवा तसेच पेनगंगानदीवर 5 उच्च पातळी बंधारे या घटकांचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रकल्पाची साठवण क्षमता 1482.765 दलघमी तसेच सिंचन क्षमता 107090 हे. आहे. प्रकल्पावर अे.आय.बी.पी. पुर्वी एकूण 65100 हे. क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे. प्रकल्पांतर्गत अे.आय.बी.पी. अंतर्गत एकूण 40800 हे. क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्मितीचे उद्दिष्टे होते त्यापैकी माहे 09/2020 अखेर एकुण 32080 क्षेत्रावर ख्षमाता निर्मित झाली आहे. उर्वरीत 8700 हे. क्षेत्रावर माहे नोव्हेंबर 2021 अखेर सिंचन क्षमता निर्मितीचे उद्दिष्टे आहे. केंद्र शासनाचे पत्र दि.28/01/2020 अन्वये AIBP अंतर्गत घटक कामांना माहे मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ मंजूर आहे. तथापि क्षेत्रिय अधिका-यांचा अहवाकानुसार AIBP अंतर्गत घटक कामे नोव्हेंबर 2021 अखेर पुर्ण करण्याचे नियोजन आहे.उर्ध्व पेनगंगा प्रकल्पास वर्ष 2004-05 पासुन अे.आय.बी.पी. अंतर्गत केंद्रिय अर्थसहाय्य प्राप्त होत आहे, प्रकल्पातील अे.आय.बी.पी. अंतर्गत मंजुर किंमत रु.1511.83 कोटी (सन 2008-09 दरसुचीप्रमाणे) असुन मार्च 2022 अखेर झालेला खर्च रु. 1244.88 कोटी आहे. सन 2024-25 मध्ये सदर प्रकल्पास AIBP अंतर्गत रु. 63.00 कोटी निधी प्राप्त आहे..

4.4 - उर्ध्व कुंडलीका मध्यम प्रकल्प : : उर्ध्व कूंडलिका मध्यम प्रकल्प, ता. वडवणी, जि. बीड या प्रकल्पास अे.आय.बी.पी. अंतर्गत सन 2008-09 पासुन केंद्रिय अर्थसहाय्य प्राप्त होत आहे, प्रकल्पाची साठवण क्षमता 18.77 दलघमी तसेच सिंचन क्षमता 2700 हे. आहे. प्रकल्पांतर्गत जून 2024 अखेर 100 हे. सिंचन क्षमता निर्मिती झालेली आहे. प्रकल्पाची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतानुसार प्रस्तावित किंमत रु.318.99 कोटी इतकी असुन अे.आय.बी.पी. अंतर्गत घटकांची किंमत रु. 271.20 कोटी आहे. प्रकल्पाची जवळपास सर्व कामे पुर्ण झाली असून प्रकल्पातील पाणी साठा व सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे. प्रकल्पाचे किमी 3 नंतर (बोगद्यानंतर) ची मुख्य कालवा व वितरण व्यवस्थेची कामे बंद नलिकेमध्ये (PDN) करण्यात आलेली असून CADWM कामे पूर्ण झालेली असून पूर्णत्व अहवाल शासनास सादर करण्यात आलेला आहे..

5) नाबार्ड

सन 2024-25, 2025-26, 2026-27 साठी महामंडळांतर्गत नार्बाडच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी (NABARD) अंतर्गत या महामंडळ कार्यालयातील उर्ध्व प्रवरा निळवंडे-2 प्रकल्पासाठी रु. 783.75 कोटी निधीची तरतुद मंजूर आहे. तसेच शिवना टाकळी मध्यम प्रकल्प व ब्रम्हगव्हाण उसिंयो या प्रकल्पांना अनुक्रमे रू 159.39 कोटी व रू 503.99 कोटी निधीची तरतुद मंजूर आहे.

6) निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचित क्षेत्रा बाबतची माहिती

महामंडळातंर्गत प्रकल्पाद्वारे जून 2022 अखेर एकूण निर्मित सिंचन क्षमता 1618.861 लक्ष हेक्टर झालेली असून जून 2021-22 या वर्षी 1084.142 लक्ष इतक्या क्षेत्रावर प्रत्यक्ष सिंचन झालेले आहे.

7) पाणीपट्टी वसुली बाबतची माहिती

महामंडळातंर्गत सन 2023-24  वर्षामधे सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी रु 310.56 कोटी इतकी वसुल झालेली आहे

8) महामंडळ स्थापने नंतर झालेल्या कामांचा संक्षिप्त आढावा
  • गोदावरी महामंडळाच्या स्थापने नंतर या महामंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत पूर्ण झालेले 365 प्रकल्पांची घळभरणी पूर्ण झाली असून 442396 हेक्टर एवढी अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण करण्यांत आली असून याव्दारे निर्मित झालेला पाणीसाठा 2772 दलघमी. एवढा आहे
  • मोठया प्रकल्पांचे घटक असलेले विष्णुपूरी प्रकल्प (11 बंधारे), मांजरा प्रकल्प (12 बंधारे), उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (मंगळूर,  दिगडी, मोहपूर, साकूर  व येंदा उच्च पातळी बंधारे), मांजरा प्रकल्प (होसूर, शिवणी बंधारे), बाभळी प्रकल्प (बळेगाव बंधारा), या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा निर्माण झाला आहे
  • कृष्णा मराठवाडा प्रकल्पांतर्गत एकूण 13 धरणांची कामे पूर्ण झाली आहेत.
  • महामंडळांतर्गत 2 मोठे (निम्न दुधना, नांदूर मधमेश्वर टप्पा-2) व 1 मध्यम उर्ध्व कुंडलीका प्रकल्प PMKSY अंतर्गत पूर्ण झाले आहेत. तसेच उर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे.
  • महामंडळाकडून शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार शासनाचे दि. 14/10/2021 च्या पत्रान्वये गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनूसार मध्य गोदावरी उपखोऱ्यात 19.29 अघफु (प्रत्यक्षात शिल्लक 14.15 अघफु) अतिरिक्ति पाणी उपलब्ध करून देण्यात आले.
    • सदर अतिरिक्त अनुज्ञेय पाण्यातून  उर्वरित मध्य गोदावरी खोऱ्यात  लोणीसावंगी उच्च पातळी बंधाऱ्याचे खालील भागात, पुर्णा उपखोऱ्यात सिद्धेश्वस धरणाचे खालील भागात, सुधा उपखोऱ्यात, दुधना उपखोऱ्यात तसेच अल्प प्रमाणात निम्न दुधना धरणाचे खालील भागात व लेंडी उपखोऱ्यात लेंडी धरणाचे खालील भागात नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात येत आहेत.
    • यामुळे बीड जिल्ह्यातील धारूर, परळी, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम, पुर्णा , नांदेड जिल्ह्यातील कंधार, लोहा, भोकर, अर्धापूर, मुदखेड तसेच हिंगोली जिल्ह्यातील औंढा, व वसमत तालुक्यात तांत्रिक दृष्ट्या योग्य ठिकाणी नव्याने प्रकल्प हाती घेणे शक्य होणार आहे.
  •  पेनगंगा उपखोऱ्यात शासनाने मंजूर केलेले पाणी
    • महामंडळाकडून शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार शासनाचे दि. 12/11/2021 च्या पत्रान्वये गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनूसार पेनगंगा उपखोऱ्यात 49.58 अघफु अतिरिक्ति पाणी उपलब्ध करून देण्यात आले. सदर पाण्याचा मराठवाडा विभागातील हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा व हिंगोली तसेच नांदेड जिल्ह्यातील आ.बाळापूर, हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहूर या तालूक्यांना त्याचा लाभ  होणार आहे. यामध्ये उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गतच्या इसापूर धरणाची तूट भरून काढण्याच्या योजना, हिंगोली व नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन प्रकल्प व उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाची तुट भरून काढणे, हिंगोली जिल्ह्यात नविन प्रकल्प घेणे व उर्ध्व पेनगंगा प्रकल्प ते निम्न पेनगंगा प्रकल्प या भागात उच्च पातळी बंधारे प्रस्तावित आहेत.
9) महामंडळांतर्गत खालील मोठया प्रकल्पांच्या कामांना चालना देण्यात आली.
  • उर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे-2): या प्रकल्पाचे काम सन 1994-95 मध्ये सुरु करण्यात आले आहे. सद्य:स्थितीमध्ये मुख्य धरणाचे काम पूर्ण होत असून सद्य:स्थितीत पूर्णक्षमतेने 8.32 TMC (236 दलघमी) पाणीसाठा निर्माण झाला असून कालव्याची कामे प्रगत आहेत. डाव्या व उजव्या कालव्याचे अस्तरीकरण व बंद नलिकेची कामे प्रगत आहेत..
  • लेंडी प्रधान प्रकल्प लेंडी हा आंतरराज्यीय प्रकल्प असून या प्रकल्पांतर्गत धरणाची कामे, कालव्याची कामे व पुर्नवसनाची कामे प्रगत आहेत.
  • कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प: या प्रकल्पामूळे प्रथम टप्प्यात उस्मानाबाद जिल्हयासाठी 5.32 टीएमसी (150.66  दलघमी ) व बीड जिल्हयासाठी 1.68 टीएमसी  (47.57 दलघमी )  पाणी उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत विविध घटक कामे प्रगत आहेत.
    • प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यतेनुसार कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात करावयाचे असून प्रथम टप्पा 7.00 अ.घ.फु. साठी व दुस-या टप्प्यात उर्वरीत 16.66 अ.घ.फु. साठीची कामे हाती घ्यावयाची आहेत. त्यानुसार प्रथम टप्प्यातील 7.00 अ.घ.फु. ची कामे प्रगतीपथावर आहेत.
    • उपसा सिंचन योजना क्र.1 : उपसा सिंचन योजना क्र.1 द्वारे उस्मानाबाद जिल्हयातील परांडा, भूम, कळंब, वाशी व उस्मानाबाद तालुक्यातील 50,480 हेक्टर सिंचनासाठी 10.41 अ.घ.फु. पाणी वापर असुन उजनी धरणापासुन 5 टप्प्याद्वारे पाणी आणावयाचे प्रस्तावित आहे.  उपसा सिंचन योजना क्र.1 ची कामे उपसा सिंचन योजना विभाग, उस्मानाबाद यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
    • उपसा सिंचन योजना क्र.2 : उपसा सिंचन योजना क्र.2 द्वारे उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर, लोहारा व उमरगा तालुक्यातील 36,708 हेक्टर क्षेत्रास 7.57 अ.घ.फु. पाण्याच्या सिंचनासाठी वापर करण्याचे प्रस्तावित आहे. उपसा सिंचन योजना क्र.2 ची कामे कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग, उस्मानाबाद यांच्या मार्फत करण्यात येत आहेत.
    • आष्टी उपसा सिंचन योजना (5.68 अ.घ.फु.): बीड जिल्हयातील आष्टी तालुक्यातील 27,543 हे. क्षेत्रास उजनी धरणातून 5.68 अ.घ.फु. पाणी देण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेचे काम नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र.2 वैजापूर मु.वाल्मी परिसर, औरंगाबाद यांचेकडून प्रगतीपथावर आहेत.
  • वळण योजना: पश्चिम वाहिनी नद्यांद्वारे अरबी समुद्रास वाहून जाणारे पाणी अडवून प्रवाही वळण योजनाद्वारे तसेच उपसा योजनाव्दारे पूर्वे कडील गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. त्याकरीता एकुण 30 प्रवाही वळण योजनाव्दारे 220.414 दलघमी, दोन उपसाजोड योजना (उपसा (3) व उपसा (4) ) व्दारे 75.09 दलघमी व दमणगंगा एकदरे योजनेव्दारे 96.10 दलघमी तसेच दमणगंगा,वैतरणा,गोदावरी लिंक योजनाद्वारे 160.97 दलघमी  असे एकुण 477.484 दलघमी (16.86 टीएमसी) पाणी आणणेचे प्रस्तावीत आहे. त्यापैकी काही योजनांना प्र.मा मिळुन पुर्ण झालेल्या आहेत. तरी काही योजनांचे प्र.मा चे प्रस्ताव शासनास सादर झालेले आहेत. उर्वरीत योजनांचे प्रस्ताव क्षेत्रिय स्तरावर त्या फलदायी (Feasibility) आहेत किंवा कसे हे तपासणे व सर्वेक्षणाची कामे चालु आहेत.
  • सिंचन क्षमता निर्मिती : महामंडळ स्थापने नंतर आता पर्यंत 4.42 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्मिती झालेली आहे.
  • दुरुस्ती, विस्तार व सुधारणा (RRR) बाबत प्रकल्पांचा तपशील: या महामंडळांतर्गत उत्तर महामरष्ट्र प्रदेशातील 94 कामे किंमत रू 650.14 कोटी व मराठवाडा प्रदेशातील 66 कामे किंमत रु 823.97 कोटी अशा एकूण 74 कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून ही कामे पूर्ण झाल्यावर प्रकल्पाच्या क्षेत्रावर सिंचनाची पुर्नस्थापना होणार आहे.
  •  लातूर पध्दतीच्या बंधाऱ्याची कामे: जुन्या को.प.बं.चे नुतनीकरण करुन लातुर पध्दतीच्या बंधाऱ्यांची कामे प्रस्तावित असलेल्या बिंदीगिहाळ, मदनसुरी, किल्लारी-2 या तीन बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. बिंदीगिहाळ लातूर पध्दतीच्या बंधाऱ्यात पाणीसाठा झालेला आहे.
  • पुनर्स्थापना कामे: जायकवाडी प्रकल्पाच्या डावा व उजव्या कालव्यावरील पुनर्स्थापनेची कामे करण्यात आलेली असून त्यामुळे पैठण डाव्या कालव्यात 1600 ऐवजी 2400 क्युसेक्स तसेच पैठण उजव्या कालव्यात 800 ऐवजी 1200 क्युसेक्स विसर्ग वहन क्षमतेत वाढ होणार आहे.
  • उर्ध्व मानार मध्यम प्रकल्प: उर्ध्व मानार मध्यम प्रकल्प (प्रवाही व उपसा) या योजनेचे काम प्रगत आहे. उर्ध्व मानार उपसा सिंचन योजनेचे शिर्ष काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचा पाणीसाठा 107.986 द.ल.घ.मी. इतका आहे व 2019 अखेर 11315 हेक्टर (धरण+उपसा) सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.उपसा सिंचन योजनेचे विकेंद्रीत जलसाठा निर्मितीसह काम जून 2026 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
  • प्रशासकीय मान्यता/सुधारीत प्रशासकीय मान्यता: महामंडळ स्थापनेपासुन (सन 1998 ) ते आतापर्यंत (नोव्हेंबर 2024) महामंडळाकडुन 99 प्रकल्पांना तसेच शासनाकडुन 256 प्रकल्पांना असे एकुण 355 प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे.
    तसेच, महामंडळ स्थापनेपासुन (सन 1998) ते आतापर्यंत (नोव्हेंबर 2024) महामंडळाकडुन 94 प्रकल्पांना तसेच शासनाकडुन 212 प्रकल्पांना असे एकुण 306 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे
सारांश :
  • गोदावरी महामंडळाच्या स्थापने नंतर या महामंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत पूर्ण झालेले 365 प्रकल्पांची घळभरणी पूर्ण झाली असून 442396 हेक्टर एवढी अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण करण्यांत आली असून याव्दारे निर्मित झालेला पाणीसाठा 2772 दलघमी. एवढा आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे अहमदनगर, नाशिक व मराठवाडयातील 8 जिल्हयांचा सिंचनाचा तसेच बिगर सिंचनाचा प्रश्न सुटण्यांस मदत झालेली आहे. सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कृषी उत्पन्नावर आधारित व्यवसाय, तसेच औद्योगिकरणास चालना मिळाली आहे. या प्रकल्पांतील पाणीसाठयातून मोठया शहरांना तसेच प्रकल्प परिसरातील लहान मोठया गावांना पिण्याच्या पाण्याचा लाभ होत आहे.
  • नाशिक प्रदेशातून समन्यायी पाणीवाटपाच्या तत्वावर जायकवाडी प्रकल्पासाठी सन 2014-15 साठी 7.89 TMC, सन 2015-16 साठी 12.84 TMC,सन 2018-19 साठी 8.99TMC, सन2023-24 7.84 TMC पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.