img

आमच्याबद्दल

गोदावरी नदीचे महाराष्ट्र राज्याच्या वाटयाचे पाणी उपयोगात आणण्यासाठी व गोदावरी नदीच्या खोऱ्यातील पाटबंधारे प्रकल्पास,लाभक्षेत्र विकासास तसेच जलविद्युत उर्जा निर्मिती योजनांना चालना देण्यासाठी व कार्यान्वित करण्यासाठी आणि पूर नियंत्रणासह इतर संलग्न व अनुषंगिक कामासाठी महाराष्ट्र शासनाने अधिनियमक्र.23, दिनांक17/08/1998 अन्वये गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. महामंडळाचा आर्थिक कारभार दिनांक 01/10/1998 पासून स्वतंत्रपणे सुरु झालेला आहे. गोदावरी खोऱ्यातील महाराष्ट्राच्या वाटयाला आलेले पाणी द्रुतगतीने उपयोगातआणून खोऱ्यातील पाटबंधारे प्रकल्प, लाभक्षेत्र विकास प्रकल्प, जल विद्युत व उर्जा निर्मिती योजना इत्यादींना चालना देण्यासाठी महामंडळाची स्थापना झाली. या महामंडळाचे कार्यक्षेत्र मराठवाडयातील 8 जिल्हे (औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर व उस्मानाबाद (अंशत:), उत्तर महाराष्ट्र प्रदेशातील अहमदनगर (अंशत:) व नाशिक हे 2 जिल्हे अशा एकूण 10 जिल्हयांतील व एकूण 105 तालुक्यातील असून यातील 36 तालुके अवर्षण प्रवण क्षेत्रातील आहेत.