img

कार्यप्रकार

कार्यप्रकार

  • तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना दिनांक 1 जानेवारी-1998 रोजी झालेली असून महामंडळाचे कार्यक्षेत्र तापी खोऱ्यातील जळगांव, धुळे नंदूरबार व नाशिक (अंशत:) या चार जिल्ह्यात येते.
  • सदर महामंडळ तापी नदी खोरे अभिकरण म्हणुनही कार्यरत आहे. नदी खोऱ्यातील सर्व बांधकामाधिन पाटबंधारे प्रकल्पांचे सर्वेक्षण, संकल्पन व बांधकाम करणे, बांधकाम पूर्ण झालेले प्रकल्प व्यवस्थापन विभागास वर्ग करुन त्यांचे देखभाल, दुरुस्ती व व्यवस्थापन करणे, सिंचन-बिगर सिंचन पाणीपट्टीची वसूली करुन शासनास महसुल जमा करुन देणे ही सर्व कामे महामंडळ नियमित तत्वावर करत आहे.
  • तापी नदीमधुन मोठ्या प्रमाणावर वाहुन जाणारे पुराचे पाणी अडवुन व उपसा करुन, साठवण तलावामध्ये साठवून, बंद नलिका प्रणालीद्वारे तसेच ठिबक सिंचनाद्वारे शेतीला पुरविण्याचे महत्वाकांक्षी प्रकल्प, तापी पाटबंधारे विकास महामंडळाने हाती घेतलेले आहेत.
  • नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या आदिवासी भागातील गावांचे पुनर्वसन करण्याचे कामही तापी पाटबंधारे विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे.
  • तापी नदीच्या खोऱ्यामध्ये, भूजलाच्या वाढीसाठी “ महाकाय पुनर्भरण योजना ” ही महत्वाकांक्षी योजना तसेच गिरणा नदीवरील नविन तंत्रज्ञानाने बांधण्यात येणारे “ बलुन बंधारे ” या महामंडळाकडील वैशिष्ठ्यपूर्ण योजना आहेत.