img

कार्यप्रकार

कार्यप्रकार

  • विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना दिनांक दि.28 एप्रिल 1997 रोजी झालेली असून महामंडळाचे कार्यक्षेत्रात विदर्भातील गोदावरी, तापी व महानदी खो-यातील क्षेत्राचा समावेश होतो. कार्यक्षेत्रात विदर्भातील नागपूर महसुल क्षेत्रातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा, या सहा जिल्ह्यांचा तसेच अमरावती महसुल क्षेत्रातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला व बुलडाणा या 5 जिल्ह्यासह एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश होतो.
  • विदर्भातील गोदावरी, तापी व महानदी खो-यातील सर्व बांधकामाधिन पाटबंधारे प्रकल्पांचे सर्वेक्षण, संकल्पन व बांधकाम करणे, बांधकाम पूर्ण झालेले प्रकल्प व्यवस्थापन विभागास वर्ग करून त्यांचे देखभाल, दुरूस्ती व व्यवस्थापन करणे, सिंचन-बिगर सिंचन पाणीपट्टीची वसूली करणे आदि सर्व कामे महामंडळ नियमित पणे करत आहे.
  • गोसीखुर्द प्रकल्पाच्या निम्न भागास पावसाळयात वैंनगंगा नदीतील वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याची उचल करून विदर्भातील अवर्षण प्रवण क्षेत्रास उपलब्ध करून देण्याकरीता वैनगंगा-नळगंगा नदीजोड महत्वाकांक्षी योजना प्रस्तावित करण्यांत आलेली आहे.
  • स्वातंत्र पूर्व काळात पूर्व विदर्भात बांधण्यात आलेल्या माजी मालगुजारी तलावापैकी 132 तलाव महामंडळाकडे असून त्यांचे देखभाल, दुरूस्ती व व्यवस्थापन ही सर्व कामे महामंडळ नियमितपणे करत आहे.