महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

आपली सेवा आमचे कर्तव्य

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे. वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत. पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट                 https://aaplesarkar.mahaonline.gov.in

जलसंपदा विभागामार्फत पुरविण्यात येणार्‍या सेवासाठी      लॉगइन करिता इथे क्लिक करा

कृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.

अ.क्र. विषय पहा/डाउनलोड करा
1 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
2 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम- नियम राजपत्र
3 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ बाबतचा जलसंपदा विभागाचा शासन निर्णय
4 लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ अधिसूचना, मुख्य अभियंता,गोसेखुर्द प्रकल्प  जलसंपदा विभाग, नागपूर-राजपत्र
5 लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ अधिसूचना, मुख्य अभियंता,जलसंपदा विभाग, अमरावती-राजपत्र
6 लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ अधिसूचना, मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प, जलसंपदा विभाग, अमरावती-राजपत्र    
7 लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ अधिसूचना, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर-राजपत्र

जलसंपदा विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या कलम ३(१) अन्वये अधिसूचीत करण्यात आलेल्या सेवा

सेवा क्रमांक लोकसेवेचा तपशील सेवा मागणीसाठी आवश्यक कागदपत्रे सेवा उपलब्धतेसाठी आकारण्यात येणारे शुल्क सेवा पुरविण्याचा कालावधी पद निर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी दिृवतीय अपिलीय अधिकारी विहित नमुन्यातील अर्ज
पाणीवापर संस्थेस देय पाणी हक्क मंजूरी देणे विहित नमुन्यातील अर्ज नि:शुल्क १५ दिवस (हंगाम सुरु झाल्यानंतर) संबंधित शाखा अधिकारी संबंधित उप अभियंता संबंधित कार्यकारी अभियंता
पाणीवापर संस्थेस पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे विहित नमुन्यातील अर्ज नि:शुल्क १५ दिवस संबंधित शाखा अधिकारी संबंधित उप अभियंता संबंधित कार्यकारी अभियंता
बिगर सिंचन पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे विहित नमुन्यातील अर्ज नि:शुल्क १५ दिवस संबंधित शाखा अधिकारी संबंधित उप अभियंता संबंधित कार्यकारी अभियंता
पाणीपट्टी देयक तक्रार निवारण करणे विहित नमुन्यातील अर्ज नि:शुल्क १५ दिवस संबंधित शाखा अधिकारी संबंधित उप अभियंता संबंधित कार्यकारी अभियंता
लाभक्षेत्राचा दाखला देणे विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२ चा उतारा नि:शुल्क १ महिना संबंधित कार्यकारी अभियंता संबंधित अधिक्षक अभियंता संबंधित मुख्य अभियंता
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत, कटक मंडळे (Cantonment Board) यांना घरगुती पाणीवापर परवाना देणे विहित नमुन्यातील अर्ज, योजनेचा नकाशा, ७/१२ चा उतारा, प्रमाणित अभियंत्याचा अश्वशक्ती याबाबतचा तांत्रिक अहवाल, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा आराखडा व नकाशा (STP), सांडपाणी यंत्रणा उभारण्याचे हमीपत्र नि:शुल्क ३ महिने संबंधित कार्यकारी अभियंता संबंधित अधिक्षक अभियंता संबंधित मुख्य अभियंता
महानगर पालिका, खाजगी विकासक, विशेष नगर विकास प्रकल्प यांना घरगुती/औदयोगिक पाणी वापर परवाना देणे विहित नमुन्यातील अर्ज, म.जि.प्रा. प्रमाणित लोकसंख्या परिगणना व पाणीवापर, योजनेचा नकाशा, संरेखा, ७/१२ चा उतारा, हमीपत्र, प्रमाणित अभियंत्याचा अश्वशक्ती याबाबतचा तांत्रिक अहवाल, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा आराखडा व नकाशा (STP), सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारण्याचे हमीपत्र, विशेष नगर विकास प्रकल्पासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र नि:शुल्क ६ महिने संबंधित कार्यकारी अभियंता संबंधित अधिक्षक अभियंता संबंधित मुख्य अभियंता
औदयोगिक प्रयोजनासाठी पाणी वापर परवाना देणे विहित नमुन्यातील अर्ज, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, योजनेचा नकाशा, संरेखा, ७/१२ चा उतारा, उदयोग सूरु करण्याचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे कन्सेन्ट टू एस्टब्लिश/पर्यावरण प्रमाणपत्र, हमीपत्र, प्रमाणित अभियंत्याचा अश्वशक्ती याबाबतचा तांत्रिक अहवाल, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा आराखडा व नकाशा (STP), सांडपाणी यंत्रणा उभारण्याचे हमीपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र नि:शुल्क ६ महिने संबंधित कार्यकारी अभियंता संबंधित अधिक्षक अभियंता संबंधित मुख्य अभियंता
नदी व जलाशयापासून अंतराचा दाखला देणे विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२ चा उतारा, प्रस्तावित जागा व नदी/जलाशय दर्शविणारा गाव नकाशा नि:शुल्क १ महिना संबंधित कार्यकारी अभियंता संबंधित अधिक्षक अभियंता संबंधित मुख्य अभियंता
१० उपसा सिंचन परवानगी देणे विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२ चा उतारा, ८ अ चा उतारा नि:शुल्क २ महिने संबंधित कार्यकारी अभियंता संबंधित अधिक्षक अभियंता संबंधित मुख्य अभियंता