तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना दिनांक 1 जानेवारी-1998 रोजी सन 1998 च्या महाराष्ट्र अधिनियम क्र.4 अन्वये झालेली आहे. महामंडळाचे कार्यक्षेत्र तापी खोऱ्यातील जळगांव, धुळे नंदूरबार व नाशिक (अंशत:) या चार जिल्ह्यात येते. महामंडळाच्या कार्यक्षेत्रात येणारे भौगोलिक क्षेत्र 29.58 लक्ष हेक्टर आहे. खानदेशातील तापी खोऱ्यातील जळगांव, धुळे, नंदुरबार व नाशिक (अंशत:) या चार जिल्ह्यांचे लागवडीलायक क्षेत्र एकूण 19,65,262 हेक्टर इतके आहे. त्यापैकी 8,47,736 हेक्टर अंतिम सिंचन क्षमता निर्मित करणे शक्य आहे. महामंडळ स्थापनेपुर्वी एकूण 3 मोठे, 16 मध्यम व 197 लघू प्रकल्प असे एकूण 216 प्रकल्प पूर्ण झालेले असून त्याव्दारे 2,90,026 हेक्टर सिंचन क्षमता व 1482.236 दलघमी पाणीसाठा निर्माण झाला आहे. महामंडळ स्थापनेनंतर 4 मध्यम, 64 लघू प्रकल्प असे एकूण 68 प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. पूर्ण झालेल्या प्रकल्पाद्वारे 34,972 हेक्टर सिंचन क्षमता व 150.33 दलघमी पाणीसाठा निर्माण करण्यात आला आहे.